काही समीक्षण, काही चिन्तन
‘प्रा. मे. पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान’ हा मराठी भाषेतील एक अपूर्व असा ग्रन्थ आहे. एखाद्या तत्त्ववेत्त्याच्या हयातीतच त्याच्या तत्त्वचिंतनाविषयी मोकळेपणाने समकक्ष लोकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवावी व तत्त्ववेत्त्याने त्यांचा त्याच ग्रन्थात परामर्श घ्यावा अशा स्वरूपाचे हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे. अन्य भारतीय भाषांतही अशा स्वरूपाचा ग्रन्थ प्रसिद्ध झाल्याचे मला माहीत नाही. इंग्रजीमध्ये मात्र Living Philosopher’s Library …